Real & Fake Rudraksha | खरा आणि बनावट रुद्राक्ष कसा ओळखावा?

पुढारी वृत्तसेवा

बाजारात प्लास्टिक, फायबर, लाकूड/भद्राक्षापासून बनवलेले बनावट रुद्राक्ष विकले जातात

खरा आणि बनावट रुद्राक्ष ओळखण्यासाठी सोप्या पद्धती जाणून घ्या

खऱ्या रुद्राक्षावर असलेल्या रेषा नैसर्गिक, खोल, स्पष्ट, असमान असतात.

बनावट रुद्राक्षावर ब्लेडने किंवा मशीनने कापलेल्या रेषा अगदी सरळ आणि एकसमान दिसतात.

खऱ्या रुद्राक्षाचे काटे टोकदार आणि थोडे असमान असतात.

बनावट रुद्राक्षाचे काटे गुळगुळीत आणि साच्यात (Mold) तयार केल्यासारखे एकसारखे दिसतात.

रुद्राक्ष पाण्यात १० मिनिटे उकळावा. प्लास्टिक/गम वापरून बनवला असेल, तर तुकडे पडू लागेल.

खरा रुद्राक्ष उकळल्याने खराब होत नाही. खरा रुद्राक्ष खूप कठीण असतो.

मॅग्निफाईंग ग्लासने पाहिल्यास खऱ्या रुद्राक्षाच्या रेषांमध्ये लहान खड्डे, नैसर्गिक पोत दिसतो.

सुईने रुद्राक्षाच्या रेषेत कोरण्याचा प्रयत्न केल्यास, बनावट (मसाल्याचा किंवा लाकडाचा) असल्यास भुगा निघेल

बनावट रुद्राक्ष कधी कधी भद्राक्ष वृक्षापासून तयार केला जातो. तो चपटा असतो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

आयुर्वेदातील अत्यंत औषधी बेलाची पाने; असा बनवा ‘बेलपत्र स्वरस’, जाणून घ्या फायदे