Bael leaves juice -आयुर्वेदातील अत्यंत औषधी बेलाची पाने; असा बनवा ‘बेलपत्र स्वरस’, जाणून घ्या फायदे

पुढारी वृत्तसेवा

आयुर्वेदात बेलाच्या अत्यंत औषधी मानले गेले आहे

बेलाच्या फळाचा ज्यूस (Bel Sharbat) जेवढा चविष्ट आहे, तेवढा पानांचा ज्यूस चवीला गोड नसतो

पण, पानांचा ज्यूस प्रामुख्याने एक 'आयुर्वेदिक औषध' म्हणून प्यायला जातो.

सकाळी रिकाम्या पोटी १-२ चमचे बेलाच्या पानांचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

पोटात गॅस, अपचन किंवा पोट साफ होण्यासाठी हा रस फायदेशीर ठरतो.

बेलाची पाने थंड गुणाची असतात, त्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते.

रक्तातील अशुद्धी दूर करून त्वचेवरील फोड आणि अ‍ॅलर्जी कमी करण्यासाठी हा रस उपयुक्त आहे.

बेलाची ताजी, कोवळी ३ ते ४ पाने स्वच्छ धुऊन घ्या.

थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात बारीक वाटून घ्या.

हे मिश्रण सुती कपड्याने किंवा गाळणीने गाळून त्याचा रस (स्वरस) काढा.

हा ज्यूस खूप जास्त प्रमाणात पिऊ नये. दररोज सकाळी फक्त १ ते २ चमचे (१०-१५ml) रस पिणे पुरेसे असते.

यामध्ये साखर घालू नये; हवे असल्यास चिमूटभर काळे मीठ किंवा जिरेपूड टाकू शकता.

गरोदर महिला/गंभीर आजार असणाऱ्यांनी व इतरांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Beeswax|मध काढला, पण पोळ्याचं काय? पोळ्यापासून तयार होतात ‘या’ खास वस्तू