पुढारी वृत्तसेवा
थोडे कुंकू एका पेल्यात पाण्यात टाका. अस्सल कुंकू पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही
ते खाली तळाशी बसते आणि पाण्याचा रंग हळदीसारखा लालसर-पिवळा दिसतो
पाण्यावर रंग तरंगू लागला/पाण्याला गडद लाल रंग आला, तर त्यात रासायनिक रंग आहे
अस्सल कुंकवाला हळद, चुन्याचा सौम्य वास येतो. त्याचा स्पर्श मऊ, थोडासा खरखरीत असतो
केमिकलयुक्त कुंकवाला तीव्र पावडरसारखा वास येतो
अस्सल कुंकू कपाळावर लावल्यास त्वचेला जळजळ किंवा खाज होत नाही
कुंकू लावल्यानंतर कपाळावर खाज/पुरळ येत असेल, तर त्यात शिसे मिसळलेले असते
एका पांढऱ्या कागदावर थोडे कुंकू पसरवून त्यावर पाण्याचे काही थेंब टाका
नैसर्गिक कुंकूवातील पिवळा रंग कागदावर येतो
रासायनिक कुंकू वाळल्यावर काळा किंवा निळसर डाग सोडतो.
भेसळयुक्त कुंकू काही दिवसांनी काळे पडू लागते