real vs fake jaggery | अस्सल गूळ कसा ओळखायचा? खरेदीपूर्वी या ५ गोष्टी नक्की तपासा!

पुढारी वृत्तसेवा

गूळ चवीला गोड आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतो. अनेकजण गुळाचा वापर चहामध्ये, पदार्थांमध्ये किंवा नुसता खाण्यासाठीही करतात.

गुळामधील लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला ऊर्जा देतात.

बनावट गूळ पिवळा किंवा चमकदार दिसण्यासाठी त्यात केमिकल ब्लीच आणि कृत्रिम रंग मिसळले जातात.

गुळाचे वजन वाढवण्यासाठी, रंग फिकट करण्यासाठी खडूची पावडर वापरली जाते.

बनावट गुळात गोडवा वाढवण्यासाठी साखरेचा पाक किंवा ग्लुकोज सिरप आणि प्रमाण वाढवण्यासाठी स्टार्च किंवा मैद्याचा वापर केला जातो.

अस्सल गूळ ओळखण्‍यासाठी खालील 5 पद्धती जाणून घ्‍या.

शुद्ध गुळाचा रंग गडद तपकिरी, तांबूस किंवा सोनेरी-तपकिरी असतो. गूळ अतिशय चमकदार किंवा गडद पिवळा दिसत असेल, तर त्यात भेसळ असण्याची शक्यता असते.

पाण्याची चाचणी : गूळ पाण्यात विरघळल्यानंतर तळाशी पांढरी किंवा पावडरसारखी थर साचली, तर समजा तो गूळ बनावट आहे.

गुळाचा छोटा तुकडा खाऊन पहा. जर चवीला कडू किंवा खारट वाटत असेल, तर तो भेसळयुक्‍त असू शकतो.

अस्सल गूळ गरम केल्यावर सहज वितळतो. याउलट, बनावट गूळ वितळायला वेळ लागतो आणि त्यावर विचित्र फेस येऊ लागतो.

शुद्ध गूळ हाताने सहज फोडता येतो, तर बनावट गूळ रबरासारखा चिवट असतो आणि लवकर तुटत नाही.

येथे क्‍लिक करा.