पुढारी वृत्तसेवा
'युनिव्हर्सिटी ऑफ ग्रेनाडा'च्या संशोधनानुसार, रात्रीचे जेवण झोप ठरवते आणि तुमची झोप पुढील दिवसाच्या आहारावर प्रभाव टाकते.
'युरोपियन जर्नल ऑफ न्यूट्रिशन' मध्ये प्रसिद्ध संशोधनानुसार, "रात्री तुम्ही काय जेवता, यावर तुमची झोप आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता अवलंबून असतो.
या अभ्यासासाठी संशोधकांनी स्त्री-पुरुषांच्या खाण्यापिण्याच्या आणि झोपेच्या सवयींचे सलग १४ दिवस निरीक्षण केले.
झोपेचे निरीक्षणासाठी 'ॲक्सिलरोमीटर' आणि 'स्लीप ट्रॅकर्स'चा वापरण्यात आला.
प्रयोगशाळेऐवजी नैसर्गिक वातावरणात हा अभ्यास केल्यामुळे दैनंदिन सवयींचे अचूक आकलन करणे संशोधकांना सोपे झाले.
संशोधनात स्पष्ट झाले की, जास्त कॅलरीज, फॅट्स, अल्कोहोल आणि तळलेले पदार्थ रात्री खाल्ल्याने झोपेचा दर्जा कमालीचा खालावतो.
कर्बोदके , ऑलिव्ह ऑईल आणि मासे यांचा आहारात समावेश असल्यास शांत आणि दर्जेदार झोप लागते.
तुमची रात्रीची झोप पूर्ण झाली नाही, तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही 'अनहेल्दी' नाश्ता करण्याची दाट शक्यता असते.
संशोधनानुसार, सकाळी उशिरा उठणारे लोकांचा नाश्त्यामध्ये गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेण्याकडे कल असतो.
वारंवार झोपमोड झाली तर साखरेचे पदार्थ खाण्याची ओढ वाढते.
रात्री झोपण्यापूर्वी काय खातो यावर झोपेबरोबर पुढील आहारावर परिणाम होते हेच नवे संशोधन स्पष्ट करते.