पुढारी वृत्तसेवा
पूजेत किंवा आरोग्यासाठी वापरला जाणारा कापूर शुद्ध आहे की केमिकलयुक्त?
शुद्ध कापूर जळताना काळा धूर येत नाही, जळून गेल्यावरराख उरत नाही.
अशुद्ध कापूर जळताना प्रचंड काळा धूर निघतो, खाली काळी राख उरते.
पाण्यात टाकल्यास शुद्ध कापूर पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतो.
रसायने आणि मेण मिसळलेला बनावट कापूर जड असल्यामुळे पाण्यात बुडतो.
शुद्ध कापूर काही दिवस हवेत उघडा ठेवल्यास हळूहळू पूर्णपणे नाहीसा होतो.
अशुद्ध कापूर उघड्यावर ठेवला तरी आकार सहजासहजी कमी होत नाही.
शुद्ध कापूर हाताला मऊ/गुळगुळीत लागतो, सुवास नॅचरल, थंड असतो.
अशुद्ध कापूर खडूसारखा कडक, केरोसीन/ तीव्र केमिकलचा वास येतो.