पुढारी वृत्तसेवा
कोबीमध्ये किडे का होतात?
पत्ताकोबीच्या घट्ट पानांमध्ये लहान किडे आणि अळ्या लपून बसू शकतात.
काळे डाग आणि छिद्र तपासा
पानांवर छोटे छिद्र किंवा काळसर डाग दिसल्यास किडे असण्याची शक्यता असते.
पाने वेगळी करून पहा
कोबीची प्रत्येक पानं वेगळी केल्यास आत लपलेले किडे सहज दिसू शकतात.
मिठाच्या पाण्यात भिजवा
10–15 मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवल्यास छोटे किडे बाहेर येण्यास मदत होते.
हळदीच्या पाण्याचा वापर
हळद मिसळलेल्या पाण्यात धुतल्यास स्वच्छता अधिक चांगली होते.
गरम पाण्याचा हलका वापर
खूप गरम नाही, पण कोमट पाण्याने धुतल्यास घाण आणि अळ्या कमी होऊ शकतात.
वाहत्या पाण्याखाली धुवा
शेवटी स्वच्छ वाहत्या पाण्याने पत्ताकोबी व्यवस्थित धुणे महत्त्वाचे.
खराब भाग काढून टाका
जास्त खराब, कुजलेली किंवा किडलेली पाने लगेच फेकून द्या.
स्वच्छ भाजीच वापरा
योग्य प्रकारे साफ केलेली भाजी खाल्ल्यास आरोग्य सुरक्षित राहते.