Anemia: पांडू रोग म्हणजे काय... त्याची लक्षणे कशी ओळखायची?

Anirudha Sankpal

पांडू रोग म्हणजे काय

शरीरातील 'रक्त-धातू' कमी झाल्यास अवयवांना मिळणारा प्राणवायू मंदावतो, यालाच आयुर्वेदात 'पांडू रोग' म्हटले आहे.

रक्ताचे महत्त्व

रक्त हे केवळ एक द्रव नसून शरीरातील ओज, तेज, कांती आणि शक्तीचा मुख्य आधार आहे.

रक्ताल्पतेची लक्षणे

चेहरा, नखे पिवळी पडणे, सतत थकवा जाणवणे, चक्कर येणे, केस गळणे आणि हात-पाय थंड पडणे ही याची लक्षणे आहेत.

डाळिंबाचे सेवन

डाळिंब हे 'रक्त-प्रसादक' असून यातील लोह आणि व्हिटॅमिन सी रक्ताभिसरण व रक्त निर्मिती वेगाने वाढवते.

खजूर आणि मनुके

लोहयुक्त खजूर आणि मनुके रात्री दुधात भिजवून सकाळी खाल्ल्याने शरीराला पोषण आणि ऊर्जा मिळते.

तीळ, गूळ आणि बीट

सकाळी तीळ-गूळ खाणे आणि संध्याकाळी बीट-गाजराचा रस पिणे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते.

महिलांसाठी शतावरी व आवळा

महिलांमधील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी शतावरी चूर्ण आणि आवळ्याचा रस विशेष गुणकारी आहे.

भस्मांचा वापर

लोह आणि मंडूर भस्म रक्ताचे थेट पोषण करतात, मात्र याचे सेवन केवळ डॉक्टरांच्या (वैद्यांच्या) सल्ल्यानेच करावे.

येथे क्लिक करा