पुढारी वृत्तसेवा
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीकडून फ्रेंड रिक्वेस्ट आली तर सर्वप्रथम त्याचे प्रोफाइल फोटो नीट तपासा.
प्रोफाइल फोटो खूपच परफेक्ट, मॉडेलसारखा किंवा गुगलवर सहज सापडणारा वाटत असेल तर तो फेक असू शकतो.
त्या अकाउंटवर फार कमी पोस्ट्स, कमी मित्रसंख्या किंवा अलीकडेच तयार केलेले प्रोफाइल दिसत असेल तर सावध रहा.
प्रोफाइलवरील माहिती अपूर्ण, विचित्र किंवा विसंगत (उदा. वेगवेगळ्या ठिकाणांची नावे) असेल तर शंका घ्या.
सतत पर्सनल माहिती, मोबाईल नंबर किंवा आर्थिक मदत मागणारे अकाउंट बहुतेकदा बनावट असतात.
मेसेजमध्ये तुटक भाषा, कॉपी-पेस्टसारखा मजकूर किंवा संशयास्पद लिंक असेल तर क्लिक करू नका.
त्या व्यक्तीचे कॉमन फ्रेंड्स तपासा; एकही ओळखीचा मित्र नसेल तर काळजीपूर्वक निर्णय घ्या.
संशय आल्यास त्वरित त्या प्रोफाइलला ब्लॉक करा आणि संबंधित प्लॅटफॉर्मवर रिपोर्ट करा – तुमची ऑनलाइन सुरक्षितता सर्वात महत्त्वाची!