WhatsApp हॅक झाल्यास तात्काळ 'ही' पावले उचलला

मोनिका क्षीरसागर

लॉगआउट करा

तुमच्या फोनमधील व्हॉट्सॲप सेटिंग्समध्ये जाऊन 'Linked Devices' तपासा आणि अनोळखी उपकरणांमधून लॉगआउट करा.

ॲप पुन्हा इंस्टॉल करा

व्हॉट्सॲप अनइन्स्टॉल करून पुन्हा इंस्टॉल करा आणि तुमच्या नंबरने पुन्हा लॉग इन करण्याचा प्रयत्न करा.

OTP शेअर करू नका

व्हॉट्सॲप कडून आलेला ६ अंकी नोंदणी कोड (OTP) कधीही आणि कोणासोबतही शेअर करू नका.

Two-Step Verification

खाते पुन्हा मिळवताच 'Two-Step Verification' सुरू करा, ज्यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळेल.

मित्रांना सावध करा

तुमच्या संपर्कातील व्यक्तींना मेसेज किंवा कॉल करून सांगा की तुमचे खाते हॅक झाले आहे, जेणेकरून ते फसवणुकीला बळी पडणार नाहीत.

ईमेलद्वारे संपर्क

व्हॉट्सॲप सपोर्टला support@whatsapp.com वर ईमेल करा आणि विषयामध्ये "Lost/Stolen: Please deactivate my account" असे लिहा.

संशयास्पद लिंक्स टाळा

अनोळखी नंबरवरून आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा, यामुळे खाते पुन्हा हॅक होऊ शकते.

सायबर सेलकडे तक्रार

जर तुमची मोठी आर्थिक फसवणूक झाली असेल, तर त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा ऑनलाइन सायबर सेलकडे तक्रार नोंदवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा...