How to Identify Fake Paneer|बनावट पनीर कसं ओळखावं, घरच्या घरी असे तपासा

पुढारी वृत्तसेवा

अगदी सोप्या ४ पद्धतींनी तुम्ही अस्सल आणि बनावट पनीर ओळखू शकता

१) पनीरचा तुकडा पाण्यात उकळून घ्या, थंड होऊ द्या. त्यावर 'आयोडीन टिंक्चर'चे ३ थेंब टाका

पनीरचा रंग निळा किंवा काळा झाला, तर त्यात स्टार्च मिसळलं आहे

म्हणजेच पनीर बनावट आहे. रंग न बदलल्यास पनीर शुद्ध आहे.

२) पनीरचा तुकडा हातात घेऊन मळून किंवा चोळून पहा.

बनावट पनीर चुरा-चुरा होऊन हाताला रबरासारखे किंवा खूप मऊ-चिकट लागते.

अस्सल पनीर मऊ असते, पण चोळल्यास ते सहजासहजी तुटत नाही

३) पनीर पाण्यात उकळा. त्यात १ चमचा सोयाबीन पावडर/तुरीच्या डाळीची पावडर टाका, ५ मिनिटे ठेवा.

पनीरचा रंग हलका लाल किंवा गुलाबी होऊ लागला, तर त्यात युरिया, डिटर्जंटची भेसळ केली आहे.

४) पनीरचा तुकडा तव्यावर किंवा आचेवर थेट गरम करा.

बनावट पनीर गरम केल्यावर रबरासारखे ताणले जाते, प्लास्टिकसारखा वास येतो

अस्सल पनीर शेकल्यावर मऊ होते आणि त्याला दुधाचा छान सुगंध येतो.

How to Reduce Radish Smell|मुळ्याचा उग्र वास घालवण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सोपे उपाय