पुढारी वृत्तसेवा
बिडाचा (Cast Iron) तवा अस्सल आहे की नाही कसा ओळखायचा
बिडाचा तवा एल्युमिनियम/लोखंडी तव्यापेक्षा खूप जड असतो.
बिडाचा तवा जाड असतो (साधारण ३ ते ५ मिमी किंवा त्याहून अधिक).
हा तवा साच्यात वितळलेले लोखंड ओतून बनवला जातो. त्याची कडा, Handle सलग जोडलेला असतो.
बिडाच्या तव्याला चुंबक (Magnet) अतिशय घट्ट आणि वेगाने चिकटते.
नवीन बिडाचा तवा गडद राखाडी/काळ्या रंगाचा दिसतो. पृष्ठभाग थोडा खडबडीत असतो
त्यात सूक्ष्म छिद्रे असतात, जी तेल शोषून घेतात आणि तवा नैसर्गिकरीत्या नॉन-स्टिक बनवण्यास मदत करतात.
तव्यावर चमचाने मारल्यास खूप मंद आणि गंभीर/जड आवाज येतो.