पुढारी वृत्तसेवा
दूध ताजं आणि फुल क्रीम असणं महत्त्वाचं
मलाई चांगली बसण्यासाठी नेहमी गायीचं किंवा फुल क्रीम दूध वापरावं.
दूध उकळताना भांडं रुंद असू द्या
रुंद तोंडाचं पातेलं वापरल्यास दूध समान तापतं आणि मलाई जाड बसते.
दूध मंद आचेवर नीट उकळा
दूध उकळताना मोठ्या आचेवर उकळू नका. मंद आचेवर ५–१० मिनिटे उकळल्यास मलाई घट्ट बसते.
उकळलेलं दूध लगेच हलवू नका
दूध उकळल्यानंतर ढवळू नका. तसेचच ठेवले तर वर जाड थर तयार होतो.
दूध थंड होऊ द्या
दूध पूर्णपणे थंड झाल्यावरच त्यावर नीट मलाई बसते.
दूध फ्रिजमध्ये ठेवा
थंड झाल्यावर दूध झाकण न लावता फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे मलाई अधिक जाड होते.
स्टील किंवा मातीच्या भांड्यात ठेवा
स्टील किंवा मातीच्या भांड्यात ठेवलेलं दूध जास्त चांगली मलाई देते.
दुसऱ्या दिवशी अलगद मलाई काढा
चमच्याने हळूच वरची जाड मलाई काढा, दूध ढवळू नका.
रोज दूध गरम–थंड करण्याची सवय ठेवा
रोज अशी प्रक्रिया केल्यास रोज जाड, चविष्ट मलाई मिळेल.