पुढारी वृत्तसेवा
‘शुगर फ्री’ म्हणजे पूर्णपणे सुरक्षित असा गैरसमज
शुगर फ्री असा शब्द पाहून अनेक डायबिटीज रुग्ण हे बिस्किट्स निर्धास्तपणे खातात, पण हे नेहमीच सुरक्षित नसते.
साखर नसली तरी कार्बोहायड्रेट असतात
शुगर फ्री बिस्किट्समध्ये साखर नसली तरी मैदा, स्टार्च आणि कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असतात.
कार्बोहायड्रेट रक्तातील साखर वाढवतात
कार्बोहायड्रेट शरीरात गेल्यावर ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात आणि त्यामुळे शुगर लेव्हल वाढू शकते.
आर्टिफिशियल स्वीटनरही धोका ठरू शकतात
काही शुगर फ्री बिस्किट्समध्ये कृत्रिम गोड पदार्थ (Artificial Sweeteners) वापरलेले असतात, जे दीर्घकाळात इन्सुलिन रेसिस्टन्स वाढवू शकतात.
जास्त कॅलरीजमुळे वजन वाढते
शुगर फ्री असले तरी बिस्किट्समध्ये फॅट आणि कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.
डायबिटीजचा धोका
वजन वाढल्यास टाइप-2 डायबिटीज नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता वाढते, असे डॉक्टर सांगतात.
डायबिटीज रुग्णांनी लेबल नीट वाचावे
फक्त ‘Sugar Free’ न पाहता कार्बोहायड्रेट, कॅलरीज आणि फॅट किती आहेत हे पाहणे आवश्यक आहे.
मर्यादित प्रमाणातच सेवन योग्य
डॉक्टरांच्या मते शुगर फ्री बिस्किट्स रोज किंवा जास्त प्रमाणात खाणे टाळावे.
हेल्दी पर्याय निवडणे फायदेशीर
डायबिटीज रुग्णांनी बिस्किट्सऐवजी फळे, कडधान्ये, नट्स किंवा घरचे हेल्दी स्नॅक्स निवडावेत.