House Flies| घरात खूप माशा झाल्यात, सोप्या घरगुती उपायांनी पळवून लावा!

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे आणि आर्द्रतेमुळे माशांची पैदास वेगाने होते. या काळात अन्नाचे लवकर खराब होणे तसेच घरात पेये, फळांचा वास यामुळे जास्त आकर्षित होतात.

या माशांचा त्रास कमी करण्यासाठी काही घ्ररगुती उपाय बघू, सर्वात पहिले म्हणजे कापूर, कापराच्या दोन तीन वड्या धुपारतीत जाळून ती घरात सर्वत्र फिरवा, कापरचा वास माशांना सहन होत नाही

खिडकीपाशी किंवा दरवाजाजवळ तुळशीचे किंवा पुदिन्याचे रोप ठेवा. या झाडांच्या विशिष्ट सुगंधामुळे माशा घराच्या आत येत नाहीत

अजून एक एक करु शकता लिंबू कापा त्‍यात सात ते आठ लवंगा टोचा. असे लिंबू माशा जमा होत असलेल्या ठिकाणी ठेवा माशा पळून जातात

फरशी पुसताना पाण्यात थोडे खडे मिठ टाका, हे मिठ जंतूनाशक म्हणूनही काम करते परिणामी माशांचा उपद्रव कमी होतो

पाण्यात कडूनिंबाच्या तेलाचे काही थेंब टाकून त्या पाण्याने ओटा किंवा डायनिंग टेबल पुसल्यास माशा बसत नाहीत

एका वाटीत थोडे ॲपल सायडर व्हिनेगर घ्या आणि त्यात दोन थेंब लिक्विड डिश सोप टाका. याच्या सुगंधाने माशा आकर्षित होतात आणि साबणामुळे त्यात अडकून मरतात.

घरातील कचरा दररोज बाहेर टाका आणि कचराकुंडी नेहमी झाकून ठेवा. त्‍याचबरोबर शिळे अन्न किंवा कापलेली फळे उघडी ठेवू नका माशा याकडे लगेच आकर्षीत होतात

येथे क्लिक करा