पुढारी वृत्तसेवा
प्रत्येकाला राग येतो. मात्र राग मनात दाबून ठेवणे किंवा टोमण्यांतून व्यक्त करणं नातेसंबंध बिघडवू शकतं.
समोरच्याला थेट काही न सांगता उपरोधिक बोलणे, मुद्दाम दुर्लक्ष करणे किंवा तिरकस प्रतिक्रिया देणे हा अनेकदा अप्रत्यक्ष राग असतो.
मनात सतत राग साचत राहिल्यास ताण, चिडचिड, ओव्हरथिंकिंग आणि नात्यांमध्ये दुरावा वाढू शकतो.
एखादी गोष्ट खटकत असेल तर शांतपणे आणि स्पष्ट शब्दांत बोला. "तुझ्या या कृतीमुळे मला त्रास होतो" किंवा "हे वेगळ्या पद्धतीने करता येईल का?" असा संवाद अधिक परिणामकारक ठरतो.
"तू नेहमीच चुकीचं करतोस" असे म्हणण्याऐवजी, "मला या गोष्टीमुळे वाईट वाटलं" असे बोलल्यास समोरची व्यक्ती चिडत नाही.
भावनांच्या भरात घेतलेला निर्णय किंवा बोललेले शब्द अनेकदा नात्यांना कायमचे तडे देतात.
थोडा वेळ शांत राहा, खोल श्वास घ्या आणि मग संवाद साधा.
कधी कधी समोरच्याला समजून घेणं, त्याचं म्हणणं ऐकून घेणं आणि योग्य वेळी माघार घेणं हेच नातं टिकवण्याचं गमक असतं.
राग कायम मनात ठेवण्यापेक्षा माफ करण्याची सवय मानसिक आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते. त्यामुळे मन हलकं होतं आणि तणावही कमी होतो.
दररोज व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, ध्यान किंवा प्राणायाम करा, भावना लिहून ठेवा आणि विश्वासू व्यक्तीशी मोकळेपणाने बोला. या छोट्या सवयी राग नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
राग हा शत्रू नाही. चुकीच्या पद्धतीने व्यक्त केलेला राग मात्र नाती, मानसिक आरोग्य आणि आनंद तिन्ही गोष्टींना नुकसान पोहोचवू शकतो.