औषधं आणि अन्नपदार्थांवरील एक्सपायरी डेट कशी ठरते? प्रत्येक ग्राहकाला माहिती हवचं

पुढारी वृत्तसेवा

एक्सपायरी डेट का लिहिली जाते?

आपण कोणतेही औषध किंवा खाद्यपदार्थ खरेदी करताना एक्सपायरी डेट पाहतो. पण ही तारीख कंपनी कशी ठरवते, यामागे वैज्ञानिक प्रक्रिया असते.

वैज्ञानिक चाचणी

एक्सपायरी डेट ही अंदाजाने दिली जात नाही. प्रयोगशाळेतील अनेक चाचण्या आणि संशोधनानंतरच उत्पादनाची सुरक्षितता निश्चित केली जाते.

औषधांची एक्सपायरी डेट कशी ठरते?

औषध उत्पादक कंपन्या 'स्टेबिलिटी टेस्ट' करतात. यामध्ये औषध वेगवेगळ्या तापमानात आणि वातावरणात किती काळ राहतात, याची तपासणी केली जाते.

औषधाची ताकद कमी झाली तर?

एक्सपायरीनंतर औषध निष्प्रभ किंवा आरोग्यासाठी धोकादायक ठरणार नाही ना, याचीही खात्री केली जाते.

अन्नपदार्थांवर 'Best Before'

'Best Before' म्हणजे त्या तारखेपर्यंत चव, रंग आणि सुगंध सर्वोत्तम राहतो. 'Use By' म्हणजे त्या तारखेनंतर उत्पादन खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

दूध, ब्रेड आणि मांसासाठी नियम वेगळे

दूध, ब्रेड, मांस यांसारख्या लवकर खराब होणाऱ्या पदार्थांमध्ये बॅक्टेरिया किती वेगाने वाढतात, यावरून त्यांची एक्सपायरी डेट ठरवली जाते.

40°C तापमानातही केली जाते चाचणी

'Accelerated Testing' मध्ये उत्पादन 40°C तापमान आणि 75% आर्द्रतेत ठेवले जाते. त्यामुळे कमी वेळेत त्याची शेल्फ लाइफ किती आहे, हे समजते.

'Real Time Testing' म्हणजे काय?

या पद्धतीत उत्पादन सामान्य तापमानात अनेक महिने किंवा वर्षे ठेवून त्याच्या गुणवत्तेतील बदल सातत्याने तपासले जातात.

बॅक्टेरिया आणि चवीचीही होते तपासणी

वैज्ञानिक फंगस, बॅक्टेरिया, यीस्ट वाढत आहेत का, हे पाहतात. तसेच तज्ज्ञ उत्पादनाचा रंग, वास, चव आणि पोत यांचीही तपासणी करतात.

एक्सपायरी डेटकडे कधीही दुर्लक्ष करू नका

औषध असो किंवा अन्नपदार्थ, एक्सपायरी डेट ही तुमच्या सुरक्षिततेसाठी असते. नेहमी उत्पादन खरेदी करताना आणि वापरण्यापूर्वी त्याची तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जपानमधील लोक रात्री आंघोळ का करतात? जाणून घ्या यामागचं विज्ञान

येथे क्लिक करा