अविनाश सुतार
लंडनमधील ओल्ड स्पिटलफिल्ड्स मार्केट येथे एका सर्जनशील उपक्रम म्हणून कलर वॉकची सुरुवात झाली
रस्त्यात दिसणाऱ्या विशिष्ट रंगाच्या वस्तूंवर लक्ष देऊन वॉक घेतला जातो. एक रंग निवडून संपूर्ण चाल त्या रंगाला आपल्या आसपास कुठे आणि कशा स्वरूपात दिसते, हे निरीक्षण केले जाते
कलर वॉक करताना रंगांचे जाणूनबुजून निरीक्षण करण्यासाठी मनाला प्रशिक्षित केल्यावर इंद्रिये उत्तेजित होतात, त्यामुळे चिंताग्रस्त विचार मंदावतात आणि वर्तमान क्षणाशी पुन्हा जोडले जातात
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संतोष बांगार यांच्या मते, कलर वॉक ही कमी श्रमाची कृती मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी मार्ग ठरू शकते
कलर वॉक करताना एखादा रंग निवडा आरामशीर गतीने चालत राहा आणि दारे, फलक, झाडांची पाने ते लोकांचे कपडे सगळे मन लावून निरीक्षण करा, गती कमी करा, दृष्टी सौम्य करा किंवा शांत करणारा रंग निवडा
कलर वॉक सजगतेची भावना वाढवतो, ज्यामुळे मेंदूतील पॅरासिंपथेटिक नर्व्हस सिस्टीम सक्रिय होते, एंडॉर्फिन्स आणि सेरोटोनिन तयार होऊन नैसर्गिकरीत्या मूड सुधारण्यास मदत होते
तेजस्वी रंग मेंदूला माहिती अधिक चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्यास मदत करतात. चालताना विशिष्ट रंगांवर लक्ष केंद्रित केल्याने एकाग्रता वाढते आणि दैनंदिन जीवनातील तपशील शोधण्याची क्षमता सुधारते
हिरवा आणि निळा अशा रंगांचा मनावर शांत करणारा परिणाम होतो. हिरवळ असलेल्या जागेत चालणाऱ्या लोकांचे हृदयाचे ठोके कमी होतात
फोकस रंगांवर ठेऊन हळुवार गतीने चालल्यानेही हृदय निरोगी राहते, रक्ताभिसरण सुधारते आणि हालचालींमध्ये लवचिकता येते. नियमितपणे केल्यास रोगप्रतिकार शक्ति वाढण्यास मदत होते
आपल्या परिसरातील रंग, पोत, आकार, विरोधाभास आणि नमुने पाहताना सर्जनशील विचारांना चालना मिळते. विद्यार्थी, डिझायनर, लेखक किंवा मानसिक थकवा जाणवणाऱ्या कोणालाही कलर वॉक नवीन कल्पना आणि दृष्टीकोन देतो