अविनाश सुतार
गूळ आणि हरभरा खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे मिळतात पण ते कधी आणि कसे खावे हेही महत्त्वाचे आहे
गूळ फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे गूळ ताजा, थंड राहतो आणि उन्हाळ्यात खाल्ल्यावर त्रास होत नाही, परंतु गूळ गरम असल्याने रात्री झोपण्याच्या आधी खाल्ल्यास त्रास होऊ शकतो
ऊर्जा आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध गूळ आणि हरभरा हिवाळ्यात शरीर उबदार, मजबूत आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो, जड जेवणानंतर गूळ खाणे लगेच टाळावे
गुळामध्ये लोखंड (Iron) आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते, हरभऱ्यामध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर असते, ते हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते
हरभरा वाईट कोलेस्टेरॉल कमी करतो, नियमित गूळ खाल्ल्यास अशक्तपणाची शक्यता कमी होते. हिमोग्लोबिन वाढल्याने हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते
वारंवार बद्धकोष्ठता, पोटफुगी किंवा गॅसची समस्या होत असेल तर आहारात गूळ आणि हरभरा समाविष्ट करणे फायदेशीर ठरू शकते
हरभरा आणि गुळात तंतुमय घटक (फायबर) जास्त प्रमाणात असतात, जे पोट साफ होणे आणि पचन सुधारण्यास मदत करतात
हरभऱ्यातील प्रथिने (प्रोटीन) व्यायामानंतर स्नायू पुनर्बांधणीसाठी महत्त्वाची असतात. व्यायामानंतर आहारात समावेश केल्याने स्नायू लवकर पुनर्प्राप्त होतात
गूळ हरभरा खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता सुधारते. गूळ अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते, दोन्हीमध्ये फॉस्फरस असतो, जे दात आणि हाडांसाठी आवश्यक असते