पुढारी वृत्तसेवा
जेव्हा शशीरात कफ वाढलेला असतो, तेव्हा चेहऱ्यावर पफीनेस (सुजल्यासारखा) दिसतो, खोकला सर्दी सतत येते राहते.
कफामुळे लोक कंटाळून जातात पण हा कंट्रोल कसा करावे यासाठी काही घरगुती उपाय आहेत ते पाहू
गोल्डन मिल्क : हळदीचे दूध हे तर शरिरासाठी खूप फायदेशीर असते पण त्यात तुम्ही एक चिमुठभर सुंठ पावडर घाला ते उकळून त्याचा अर्क उतरल्यावर ते घ्या
घ्येण्याची योग्य वेळपण पाहिजे हे दूध झोपताना घेऊ नका तर सांयकाळी ४ ते ८ च्या दरम्यान याचे सेवन करावे, हळदीमुळे रोगप्रतिकारशक्ती तर सुंठेमुळे कफ कमी होतो.
दुसरा उपाय म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तुळस व आल्याचा यांचा काढा घेणे तुळस त्रिदोष नाशक असते तर आल्यामुळे पचनक्रिया निट होते परिणामी कफ निघून जातो
यानंतरचा उपाय म्हणजे अशळीचा काढा एक थोडीशी अळशी घ्या कए पाणी घ्या ती आठवून अर्धा कप करा व हे पाणी घ्या, हेही उपयुक्त ठरते
दुसरी म्हणजे अळशीची पूड करुन ती तुम्ही छातीला जरी चोळली तरी कफ कमी करते
सुंठ व धने याचे पाणी एकत्र घ्या, धने शरिरातील उष्णता कमी करते तर सुंठ जठराग्नी वाढवते, यामुळे तुमच्या घशात येणारा येणार कफ कमी करण्यास मदत करते