Calf Pain|तुमच्याही पोटऱ्या सतत दुखतात का? या गोष्टी करुन पहा निश्चितच पडेल आराम

पुढारी वृत्तसेवा

आजकाल माणसाचे जीवन खूप धावपळीचे झाले आहे. त्‍यात व्यायामाचा अभाव असला की अनेक व्याधी जडतात

यापैकी सध्या कॉमन तक्रार असते ती म्हणजे पायाच्या पोटऱ्या सतत दुखणे, यामध्ये महिलांना हा त्रास खूप होतो,काय काय कारणे असू शकतात ते पाहू

आपल्या पोटऱ्यांमध्ये मेंदू पेक्षा जास्त रक्त असते, जवळपास ५०० मिली रक्त या पोटऱ्यांमध्ये असते, त्‍यामुळे रक्ताभिसरण चांगले कसे होईले हे पाहावे लागते.

तसेच तुमचे स्नायू कमजोर असतात, तसेच ब्लड सर्क्यूलेशनमध्ये कुठेतरी गडबड आहे म्हणजे बीपी कमी किंवा जास्त तरी होत आहे. यामुळे हे दुखणे सुरु होते

पाणी कमी पडते आहे दुसरी महत्‍वाची गोष्ट म्हणजे शरिरात पाणी कमी पडणे, डिहायड्रेशन झाल्यावर सुद्धा पोटऱ्या दुखू लागतात

काय करता येईल, पहिली गोष्ट म्हणजे रात्री झोपताना कोमट तेलाने पोटऱ्यांचे मालिश करणे , यामुळे ब्लड सर्क्यूलेशन वाढते व दुखणे कमी होते

ताडासन - ताडासन केल्यामुळे पोटऱ्यामधील स्नायू ताण पडतो स्नायूंमधील स्टिफनेस कमी होतो परिणामी पोटऱ्यां दुखणे कमी होतात.

कुकडू पोझिशनमध्ये बसने : कोंबड्या सारखे म्हणजे कुकडू पोझिशनमध्ये बसल्यावर पोटऱ्याच्या स्नायूमध्ये रक्तप्रवाह सुरळीत होतो व दुखणे कमी होते.