स्वालिया न. शिकलगार
कच्चे रताळे: ३, तेल, सैंधव मीठ, काळी मिरी पावडर अर्धा छोटा चमचा
सर्वप्रथम कच्चे रताळे पाण्यात स्वच्छ धुवून घ्या.
त्यानंतर रताळ्याची साल पूर्णपणे काढून टाका
किसणीने रताळ्याचे पातळ वेफर्स थेट पाण्याच्या भांड्यात पाडा
यामुळे रताळे काळे पडत नाहीत, अतिरिक्त स्टार्च निघतो
पाण्यातून चिप्स बाहेर काढून सुती कपड्यावर पसरवून ठेवा
१५ मिनिटे पंख्याखाली वाळवून घ्या, म्हणजे ओलावा निघून जाईल
कढईत तेल कडक गरम करून चिप्स तेलात सोडा
सोनेरी होईपर्यंत तळून घेऊन एका प्लेटमध्ये काढा.
गरम असतानाच त्यावर सैंधव मीठ, काळी मिरी पावडर टाका