दैनंदिन वापरातील सोन्याचे दागिने काळे पडलेत? 'असे' करा घरच्या घरी स्वच्छ

पुढारी वृत्तसेवा

चमक हरवली आहे का?

रोजच्या वापरातील अंगठी, चैन किंवा कानातले डुल धुळीमुळे आणि घामामुळे काळे पडू लागतात.

घरगुती उपाय सर्वोत्तम

सोनाराकडे न जाता तुम्ही घरच्या घरी अगदी कमी वेळात दागिने पूर्वीसारखे चमकवू शकता.

कोमट पाण्याचा वापर

एका वाटीत थोडे कोमट पाणी घ्या आणि त्यात माइल्ड लिक्विड डिश सोप किंवा बेबी शॅम्पू टाका.

काही वेळ भिजत ठेवा

सोन्याचे दागिने या साबणाच्या पाण्यात १० ते १५ मिनिटांसाठी भिजत ठेवा, जेणेकरून त्यावरील मळ सैल होईल.

मऊ ब्रशने साफ करा

जुन्या मऊ टूथब्रशचा वापर करून दागिन्यांच्या कोनाकोपऱ्यातील घाण हलक्या हाताने घासून काढा.

साध्या पाण्याने धुवा

घासून झाल्यावर दागिने स्वच्छ साध्या पाण्याने धुवून घ्या, जेणेकरून साबणाचा अंश राहणार नाही.

कोरड्या कपड्याने पुसा

दागिने धुवून झाल्यावर ते सुती मऊ कपड्याने किंवा टिश्यू पेपरने टिपून पूर्णपणे कोरडे करा.

मिळेल नव्यासारखी चमक

या साध्या प्रक्रियेमुळे तुमचे अंगठी, घंटन आणि डुल पुन्हा एकदा सोन्यासारखे लख्ख चमकू लागतील!

येथे क्लिक करा...