Cabbage Cleaning Tips|कोबी चिरताना 'या' चुका करताय का? फॉलो करा सोप्या टिप्स!

पुढारी वृत्तसेवा

कोबी हा आपल्या स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक आहे. पराठे, नूडल्स, कोशिंबीर आणि इतर अनेक भाज्यांमध्ये याचा सर्रास वापर केला जातो.

कोबी जमिनीलगत उगवतो आणि त्याचे पापुद्रे एकमेकांत घट्ट गुंफलेले असतात. त्यामुळे माती, किडे, कीटकनाशके आणि जीवाणू यांच्यासाठी हे एक सुरक्षित आश्रयस्थान बनते.

वरून स्वच्छ दिसणारा कोबी आतून मात्र दूषित असू शकतो. हे किडे सहज डोळ्यांना दिसत नसल्याने. काही साध्या टिप्स वापरून तुम्ही कोबी पूर्णपणे स्वच्छ करू शकता.

कोबीच्या वरच्या २ ते ३ पानांवर माती, रसायने आणि कीटकांचा सर्वाधिक संपर्क येतो. त्यामुळे स्वच्छतेची पहिली पायरी म्हणून ही पाने काढून टाकणे हिताचे ठरते.

कोबी पूर्ण न धुता त्याचे दोन किंवा चार भाग करा. यामुळे कोबीचे थर मोकळे होतात आणि आत दडलेले किडे सहज शोधता येतात.

कोबीचे कापलेले तुकडे १० ते १५ मिनिटे कोमट मिठाच्या पाण्यात भिजत ठेवा. मीठामुळे पानांमध्ये लपलेले किडे बाहेर पडण्यास मदत होते.

एका बाऊलमध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यात १-२ चमचे व्हिनेगर टाका आणि ५ ते ७ मिनिटे कोबी त्यात भिजवा. व्हिनेगरमुळे जीवाणू नष्ट होतात आणि पानांना चिकटलेले किडे वेगळे होतात.

शेवटी कोबी २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्या. यामुळे मीठ, व्हिनेगर आणि उरलेली घाण पूर्णपणे निघून जाईल.

कोबी चिरण्यापूर्वी त्याची पाने हलक्या हाताने बाजूला करून पुन्हा एकदा तपासा, जेणेकरून तो पूर्णपणे कीडमुक्त असल्याची खात्री होईल.

येथे क्‍लिक करा.