Choose Sweet Watermelon | लालचुटूक आणि गोड कलिंगड कसं ओळखायचं? 5 सोप्या ट्रिक्स!

पुढारी वृत्तसेवा

पिवळा डाग जरूर पाहा
कलिंगडाच्या खालच्या बाजूला पिवळसर डाग (फील्ड स्पॉट) असेल तर ते झाडावर पूर्ण पिकलेलं असतं. पांढरा डाग असेल तर ते कच्चं असण्याची शक्यता असते.

Watermelon rind uses

आवाज तपासा
हाताने हलके टॅप केल्यावर जर खोल आणि ठसठशीत आवाज आला, तर ते आतून पिकलेलं आणि रसाळ असतं.

वजन जड असावं
आकाराच्या तुलनेत जड वाटणारं कलिंगड जास्त रसाळ आणि गोड असतं.

Watermelon benefits

सालीवर चमक नसावी
जास्त चमकदार साल असलेलं कलिंगड बहुतेक वेळा कच्चं असतं. थोडी मॅट फिनिश असलेलं अधिक पिकलेलं असतं.

आकार समतोल असावा
वाकडं-तिकडं किंवा उंचवटे असलेलं कलिंगड टाळा. समतोल, गोल किंवा अंडाकृती आकार निवडा.

Watermelon | Canva

देठ कोरडा असावा
कलिंगडाचा देठ कोरडा आणि तपकिरी असेल तर ते नैसर्गिकरित्या पिकलेलं असतं.

पट्ट्यांचा रंग स्पष्ट असावा
गडद आणि फिकट हिरव्या पट्ट्यांमध्ये स्पष्ट फरक दिसत असेल तर ते चांगल्या प्रतीचं असतं.

Watermelon benefits

खूप मोठं की खूप लहान टाळा
मध्यम आकाराचं कलिंगड चविष्ट असण्याची शक्यता जास्त असते.

कापल्यावर रंग तपासा
आतला रंग गडद लाल आणि बिया काळ्या असतील तर ते गोड आणि पूर्ण पिकलेलं असतं.

Constipation Relief Diet
<strong>येथे क्लिक करा...</strong>