पुढारी वृत्तसेवा
दूधात पाणी, स्टार्च की डिटर्जंट?
फक्त 3 सोप्या ट्रिक्सने घरच्या घरी ओळखा दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त!
दररोज दूध पिता? मग ही माहिती खूप महत्त्वाची!
दूध आपल्या रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. पण बाजारात मिळणाऱ्या अनेक दूधांमध्ये भेसळ होत असल्याच्या बातम्या समोर येतात.
दूधात नेमकी कशाची भेसळ होते?
अनेकदा दूधात पाणी, डिटर्जंट आणि स्टार्च मिसळले जाते. दूध जास्त पांढरे किंवा घट्ट दिसावे म्हणून ही भेसळ केली जाते.
दूधात पाणी मिसळलंय का? अशी करा तपासणी
एका गुळगुळीत आणि थोड्या उतार असलेल्या पृष्ठभागावर दूधाचा एक थेंब टाका.
शुद्ध दूध कसं ओळखाल?
जर दूध शुद्ध असेल, तर ते हळूहळू खाली वाहील आणि मागे पांढरी रेघ सोडेल. भेसळयुक्त दूध लगेच वाहून जाईल.
दूधात डिटर्जंट आहे का?
एका भांड्यात थोडं दूध घ्या आणि त्यात पाणी मिसळून चांगलं हलवा.
फेसावरुन ओळखा भेसळ
जर हलका फेस तयार झाला तर दूध ठीक असू शकतं. पण जास्त आणि घट्ट फेस दिसत असेल, तर दूधात डिटर्जंट असण्याची शक्यता आहे.
दूधात स्टार्च मिसळलंय? अशी करा टेस्ट
थोड्या दूधात आयोडीनचे काही थेंब टाका. दूधाचा रंग बदलतो का ते पाहा.
रंग निळा झाला? सावध व्हा!
जर दूधाचा रंग निळसर झाला, तर त्यात स्टार्च मिसळलेला असू शकतो. शुद्ध दूधात फारसा रंग बदल दिसत नाही.
भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक!
यामुळे पोटाचे त्रास, पचनाच्या समस्या, अॅलर्जी आणि मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून दूध पिण्याआधी शुद्धता तपासा.