पुढारी वृत्तसेवा
वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स खाताय?
योग्य पद्धत माहिती नसेल तर फायदा होणार नाही
चिया सीड्स इतके लोकप्रिय का?
लहान दिसणारे हे बियाणे फायबर, प्रोटीन, ओमेगा-3 आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असतात.
वजन कमी करण्यात कशी मदत?
चिया सीड्स खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही.
फक्त पाण्यात भिजवून पिणं पुरेसं आहे का?
नाही! फक्त पाण्यात टाकून पिण्यापेक्षा योग्य पद्धतीने खाल्ले तरच वेट लॉसमध्ये जास्त फायदा होतो.
चिया सीड्स खाण्याची योग्य पद्धत
वजन कमी करायचं असेल तर चिया सीड्स दह्यामध्ये मिसळून खाणे अधिक फायदेशीर मानले जाते.
दह्यासोबतच का?
दह्यामधील प्रोटीन आणि प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतात.
हे कॉम्बिनेशन कसं काम करतं?
दह्यात भिजलेले चिया सीड्स फुगतात. त्यामुळे कमी कॅलरीत पोट भरल्यासारखं वाटतं.
चिया सीड्सचे इतर फायदे
पचन सुधारते, शरीराला ऊर्जा मिळते, हाडं मजबूत होण्यास मदत, हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर.
ब्लड शुगर आणि त्वचेसाठीही फायदेशीर
नियमित प्रमाणात सेवन केल्यास ब्लड शुगर बॅलन्स राहण्यास आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते.
फक्त चिया सीड्स खाऊन वजन कमी होईल?
नाही! योग्य आहार, व्यायाम आणि संतुलित जीवनशैली असेल तरच याचा फायदा होईल.