पुढारी वृत्तसेवा
विनाकारण चिडचिड, तणाव, भांडणं वाढत असतील तर ती नकारात्मक ऊर्जेची चिन्हं असू शकतात.
घरात राहताना झोप न लागणे, वाईट स्वप्न पडणे हेही नकारात्मक ऊर्जेचे संकेत मानले जातात.
एका काचेच्या वाटीत समुद्री मीठ भरून घराच्या कोपऱ्यात ठेवा. 24 तासांनंतर मीठ ओलसर झाले असेल तर नकारात्मक ऊर्जा असल्याचे मानले जाते.
पूजाघरातील दिवा किंवा अगरबत्ती सतत विझत असेल तर वास्तुशास्त्रानुसार ते नकारात्मकतेचे लक्षण आहे.
घरातील झाडं नीट काळजी घेऊनही सुकत असतील, तर नकारात्मक ऊर्जा असल्याचे संकेत मिळतात.
सूर्यप्रकाश आणि हवा न मिळाल्यास घरात नकारात्मकता वाढते.
घर साफ करताना पाण्यात थोडे मीठ मिसळल्यास नकारात्मक ऊर्जा कमी होते, असे वास्तुशास्त्र सांगते.
सकाळी सूर्यप्रकाश व ताजी हवा घरात येऊ द्या, यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते.
दररोज किंवा आठवड्यातून एकदा कपूर/धूप लावल्यास घरातील वातावरण शुद्ध होते.