Milk Purity Check : तुम्ही पितात ते दूध शुद्ध की भेसळयुक्त? FSSAI च्या 'या' ट्रिकने काही सेकंदात ओळखा!

पुढारी वृत्तसेवा

दूध हा दैनंदिन आहाराचा मुख्य भाग आहे, पण त्यात घातक रसायनांची भेसळ होण्याचे प्रमाण वाढले आहे.

दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त? या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्‍यासाठी अन्न सुरक्षा प्राधिकरणाने (FSSAI) एक अत्यंत सोपी पद्धत सांगितली आहे.

एका स्वच्छ काचेच्या ग्लासात ५ ते १० मिली दूध घ्या आणि ते थोडे वेगाने (जोरात) हलवा.

दूध हलवल्यानंतर त्यावर जास्त वेळ टिकणारा फेस किंवा फुगे तयार झाले नाहीत, तर तुमचे दूध अगदी शुद्ध आहे.

दूध हलवल्यावर जर त्यावर लगेचच दाट फेस किंवा फुगे तयार झाले, तर त्यात डिटर्जंट असण्याची शक्यता आहे.

डिटर्जंटमुळे पाण्याचा पृष्ठताण (Surface Tension) कमी होतो, ज्यामुळे दुधावरील हवेचे बुडबुडे फुटण्याऐवजी साचून राहतात.

सुरक्षिततेसाठी नेहमी राष्ट्रीय मानकांचे पालन करणाऱ्या नामांकित आणि विश्वासार्ह ब्रँडचेच दूध खरेदी करा.

दूध पॅकेट खरेदी करताना त्यावर हिरवा FSSAI लोगो आणि १४ अंकांचा परवाना क्रमांक आहे की नाही, हे आवर्जून पाहा.

येथे क्‍लिक करा.