पुढारी वृत्तसेवा
महागडा iPhone घेतल्यानंतर एकदा तपासा. फोन खरोखर Apple चा आहे का?
iPhone मध्ये Settings उघडा. नंतर General > About वर जा. इथे फोनची महत्त्वाची माहिती दिसते.
About मध्ये Model Name, Model Number दिसेल. तसेच Serial Number, IMEI आणि iOS Version तपासा. ही माहिती फोनच्या ओळखीसाठी महत्त्वाची आहे.
असली iPhone हा iOS वर चालतो. App Store, Safari आणि FaceTime तपासा.
Google Play Store दिसत असेल तर सावध व्हा.
iPhone मध्ये Siri सुरू करा. तिला एखादा साधा प्रश्न विचारा. Siri व्यवस्थित काम करतेय का ते पाहा.
फोनमधील Serial Number आणि IMEI तपासा. हे नंबर बॉक्सवरील माहितीसोबत जुळवा. नंबर वेगळे असतील तर विक्रेत्याला विचारणा करा.
बॉक्सवरील Apple लोगो आणि प्रिंटिंग पाहा. स्पेलिंगच्या चुका आहेत का ते तपासा. पॅकेजिंग खराब असल्यास सावध राहा.
फक्त Camera App उघडून थांबू नका. फोटो आणि व्हिडिओ काढून पाहा. फोनमधील प्रत्येक कॅमेरा तपासा.
जुना iPhone घेताना अधिक काळजी घ्या. Parts and Service History तपासा. कोणते पार्ट्स बदलले आहेत का ते पाहा.
फक्त लूक आणि बॉक्सवर विश्वास ठेवू नका. Settings, iOS, Siri, IMEI आणि Serial Number तपासा. सर्व माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यावरच iPhone खरेदी करा.