sleep tips : रात्री झोपेपूर्वी मन शांत कसे कराल? या टिप्स फॉलो करा
पुढारी वृत्तसेवा
झोपण्यापूर्वी मन शांत करण्यासाठी काही उपाय केल्याने ताण कमी होण्यास, अनावश्यक विचार थांबण्यास आणि चांगली झोप लागण्यास मदत होते.
झोपेपूर्वी एक तास मोबाईल फोन वापरु नका.
हळू-हळू दीर्घ श्वास घ्या आणि तोंडाने बाहेर सोडा.
पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंतच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांमधील स्नायूंना ताण द्या आणि सैल सोडा.
माईंडफुलनेस मेडिटेशनच्या सहाय्याने मनातील चिंता दूर करून वर्तमानावर लक्ष केंद्रित करा.
शांत समुद्रकिनारा किंवा बगीच्या यांसारख्या शांत दृश्याची कल्पना करा, ज्यामुळे तुमचे मन शांत होण्यास मदत होईल.
शरीराचा ताण कमी करण्यासाठी आणि आराम मिळवण्यासाठी हळू-हळू स्ट्रेचिंग करा.
तुमचे विचार आणि भावना लिहून काढा. यामुळे मनावरील ताण हलका होईल.
तुम्हाला आराम देणारे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐका.
येथे क्लिक करा.