Chapati Side Effects : सकाळ-संध्याकाळी चपाती खाताय? जाणून घ्या दुष्परिणाम
पुढारी वृत्तसेवा
अनेक घरांमध्ये गव्हाच्या पिठाची चपाती दररोज सकाळ-संध्याकाळ खाल्ली जाते.
गव्हाची चपाती हलकी, मऊ आणि चविष्ट लागते. त्यामुळे भाकरीपेक्षा चपातीला पसंती दिली जाते.
गव्हामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन बी६, फोलेट, व्हिटॅमिन ई, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि झिंक यांसारखी अनेक पोषक तत्वे असतात.
दररोज फक्त चपाती खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जाणून घेवूया त्याच्या दुष्परिणामांविषयी...
गव्हाच्या पोळीमध्ये ग्लूटेन नावाचा पदार्थ असतो. यामुळे शरीरातील रक्ताची पातळी वाढू शकते.
जास्त प्रमाणात चपाती खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते. गहू पचायला जड असतो.
गव्हाच्या चपात्यामध्ये कार्ब्स असतात. यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते.
नियमित चपाती खाल्ल्याने सुस्ती किंवा थकवा जाणवू शकतो. पोट भरल्यामुळे झोप येऊ शकते.
गव्हाच्या पिठासोबत तुम्ही नाचणी, बाजरी, जव आणि मक्याचे पीठ मिसळून मल्टीग्रेन पोळी खाऊ शकता. मल्टीग्रेन पोळी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.
वरील माहिती इंटरनेट आधारित असून, ती केवळ मार्गदर्शन म्हणून विचारात घ्यावी. आहारात बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
येथे क्लिक करा.