पुढारी वृत्तसेवा
मेंदूमध्ये वेगवेगळ्या लहरी तयार होतात. जेव्हा आपण शांत असतो, तेव्हा 'अल्फा लहरी' (8-12 Hz) सक्रीय असतात. त्या वाढवण्यासाठी संशोधनावर आधारित उपाय पाहूया...
अनेक वैज्ञानिक संशोधनांनुसार, दररोज केवळ १० ते १५ मिनिटे ध्यान केल्याने मेंदूतील अल्फा लहरींचा स्तर झपाट्याने वाढतो आणि मानसिक ताण कमी होतो.
'प्राणायाम' किंवा 'डीप ब्रीदिंग'मुळे हृदयाचे ठोके स्थिर होतात. यामुळे मेंदूला शांततेचे संकेत मिळतात आणि अल्फा लहरी सक्रीय होतात.
'जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायकॉलॉजी'च्या संशोधनानुसार, हिरवळीत किंवा निसर्गात चालण्याने मेंदूचा थकवा दूर होऊन अल्फा लहरींना चालना मिळते.
शांत संगीत किंवा 'बायनॉरल बीट्स' (Binaural Beats) ऐकल्याने मेंदू थेट अल्फा स्टेटमध्ये (Alpha State) जातो, असे अभ्यासात सिद्ध झाले आहे.
आपण डोळे बंद करून बाहेरील जगाकडून येणारे व्हिज्युअल इनपुट थांबवतो, तेव्हा मेंदूच्या 'ऑक्सिपिटल लोब'मध्ये अल्फा लहरींची निर्मिती वाढते.
संशोधनानुसार, सकारात्मक विचार करणे किंवा चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने मेंदूमध्ये आनंदी हार्मोन्ससह अल्फा लहरी वाढतात.
'शवासन'सारख्या विश्रांती देणाऱ्या योगासनांमुळे शरीरातील कोर्टिसोल (स्ट्रेस हार्मोन) कमी होते आणि अल्फा वेव्हज बूस्ट होतात.
सतत मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहिल्याने मेंदूत 'बीटा' लहरी वाढतात, ज्या तणावासाठी कारणीभूत ठरतात. म्हणूनच, अधूनमधून स्क्रीनपासून लांब राहा.
अल्फा लहरी सक्रीय झाल्याने सर्जनशीलता (Creativity) वाढते, स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि चिंता (Anxiety) दूर होते.