Rahul Shelke
लिओनेल मेस्सी तब्बल 14 वर्षांनंतर भारतात येत आहे. 13 ते 15 डिसेंबरदरम्यान तो कोलकाता, मुंबई, दिल्ली आणि हैदराबादमध्ये कार्यक्रमांना उपस्थित राहतील.
मेस्सीचा भारत दौरा म्हणजे फॅन्ससाठी पर्वणीच आहे. कोलकात्यातून सुरू होणाऱ्या GOAT India Tour 2025 मध्ये तो सांस्कृतिक कार्यक्रम, फुटबॉल क्लिनिक आणि मोठ्या फॅन इव्हेंट्समध्ये सहभागी होणार आहे.
मेस्सी भारतात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहे. शाहरुख खान, सौरव गांगुली आणि ममता बॅनर्जी यांसारखे दिग्गजही स्वागतासाठी उपस्थित राहणार.
38 वर्षीय मेस्सीची नेटवर्थ सुमारे 850 मिलियन डॉलर (जवळपास 7,700 कोटी रुपये) आहे. त्याची कमाई फुटबॉल फी, ब्रँड डील, व्यवसाय आणि गुंतवणूक यातून होते.
मेस्सी दरवर्षी 70 मिलियन डॉलर फक्त जाहिरातींमधून कमावतो अदिदाससोबत त्याची लाइफटाइम डील आहे याची किंमत 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे.
मेस्सीने रिअल इस्टेटमध्ये 50–60 मिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. बार्सिलोना, मियामी, एंडोरा, लंडनमध्ये त्याची आलिशान घरं आहेत. इबिझा आयलंडवरील घराची किंमत 100 कोटी रुपये आहे.
त्याच्या जेटची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे. यात 15 लोक प्रवास करू शकतात.
मेस्सीकडे 77 बेडरूमचे आलिशान हॉटेल, कपड्यांचा ब्रँड, मेस्सी स्टोअर आणि 150–200 मिलियन डॉलरचा बिझनेस आहे.
मेस्सीकडे ऑडी, मर्सिडीज, फरारी, रेंज रोवरसारख्या महागड्या कार्स आहेत.