कच्च्या कैरीत दडलाय पोषणाचा खजिना! जाणून घ्या जबरदस्त फायदे

पुढारी वृत्तसेवा

पोषणाचा मोठा खजिना

उन्हाळ्यात आवडीने खाल्ली जाणारी कच्ची कैरी फक्त चवदार नाही, तर शरीरासाठी पोषणाचा मोठा खजिनाही आहे.

Raw Mango | Pudhari

व्हिटॅमिन C चा जबरदस्त स्रोत

कच्च्या कैरीत शरीराला आवश्यक असलेलं व्हिटॅमिन C असतं. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचं असतं.

Raw Mango | Pudhari

डोळ्यांसाठी फायदेशीर व्हिटॅमिन A

कच्च्या कैरीत व्हिटॅमिन A चंही चांगलं प्रमाण असतं. हे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतं.

Raw Mango | Pudhari

शरीराला ऊर्जा देणारं फोलेट

कच्च्या कैरीत फोलेट म्हणजेच व्हिटॅमिन B9 भरपूर असतं. हे नवीन पेशी तयार होण्यासाठी आणि शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं.

Raw Mango | Pudhari

हृदयासाठी पोटॅशियमचा फायदा

कच्च्या कैरीत पोटॅशियमही चांगल्या प्रमाणात असतं. हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतं.

Raw Mango | Pudhari

पचन सुधारण्यासाठी फायबर

कच्च्या कैरीत जवळपास 2.6 ग्रॅम फायबर असतं. यामुळे पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठता, गॅस यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.

Raw Mango | Pudhari

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

कच्च्या कैरीत कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असल्यामुळे ती वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Raw Mango | Pudhari

उष्माघाताचा धोका कमी

कच्च्या कैरीपासून बनवलेलं पन्हं शरीराला थंडावा देतं. हे शरीर हायड्रेट ठेवून उष्माघाताचा धोका कमी करण्यास मदत करतं.

Raw Mango | Pudhari

लिव्हरसाठीही फायदेशीर

तज्ज्ञांच्या मते, कच्ची कैरी लिव्हर डिटॉक्स करण्यात मदत करू शकते. तसेच शरीरातील पित्त संतुलित ठेवण्यासही ती उपयोगी मानली जाते.

Raw Mango | Pudhari

कच्ची कैरी कशी खावी?

कच्ची कैरी पन्हं, चटणी, कोशिंबीर किंवा मसाला लावून खाऊ शकता. मात्र अति सेवन टाळा आणि संतुलित प्रमाणातच आहारात समाविष्ट करा.

Raw Mango | Pudhari

Coffee Addiction : रोज कॉफीचे सेवन? स्मरणशक्तीसाठी किती फायदा किती तोटा?

Coffee addiction | Pudhari
येथे क्लिक करा