Coffee Addiction : रोज कॉफीचे सेवन? स्मरणशक्तीसाठी किती फायदा किती तोटा?

Asit Banage

सकाळची सुरुवात कॉफीने करणाऱ्या अनेकांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एका ताज्या संशोधनानुसार, नियमितपणे कॉफी पिण्यामुळे माणसाची स्मरणशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते.

‘नेचर कम्युनिकेशन‌’ या प्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या संशोधनानुसार, जे लोक नियमितपणे कॉफी पितात, त्यांच्या तुलनेत कॉफी न पिणाऱ्यांची स्मरणशक्ती अधिक चांगली असल्याचे आढळले आहे.

अभ्यासात असे दिसून आले की, ज्यांना कॉफीचे व्यसन नाही, त्यांची मेमरी परफॉर्मन्स ही कॉफीप्रेमींपेक्षा सरस होती.

जे लोक कॉफीशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या मानसिक क्षमतेत घट होत असल्याचे निरीक्षणात आले आहे.

केवळ स्मरणशक्तीच नाही, तर कॉफीचा परिणाम मानवी वर्तणुकीवरही होतो, असे आढळले.

मर्यादित प्रमाणात कॉफी सेवन करणे कधीही चांगले आहे.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...