shreya kulkarni
लग्नासाठी किंवा पार्टीसाठी चेहऱ्यावर झटपट चमक हवी असेल, तर अनेकजण फेस ब्लीचचा वापर करतात. यामुळे टॅनिंग दूर होते आणि चेहरा उजळ दिसतो.
ब्लीचमध्ये केमिकल्स असल्याने त्याचा जास्त वापर त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे महिन्यातून किती वेळा ब्लीच करणे सुरक्षित आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, महिन्यातून फक्त एकदाच चेहऱ्यावर ब्लीच करणे पुरेसे आहे. चेहऱ्यावरील केसांची वाढ कमी असल्याने वारंवार ब्लीच करण्याची गरज नसते.
महिन्यातून एकापेक्षा जास्त वेळा ब्लीच केल्यास त्वचेवर लालसरपणा येणे, खाज सुटणे किंवा जळजळ होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
जर तुमची त्वचा संवेदनशील (Sensitive Skin) असेल, तर ब्लीच करणे टाळा. त्यातील अमोनिया आणि हायड्रोजन पेरॉक्साइडमुळे तुमच्या त्वचेचा त्रास आणखी वाढू शकतो.
ब्लीच केल्यावर त्वचा नाजूक होते. त्यामुळे चेहऱ्यावर लगेच मॉइश्चरायझर लावा आणि कमीत कमी ५-७ दिवस उन्हात जाणे टाळा.
केमिकल टाळायचे असेल, तर लिंबू आणि मधाचे मिश्रण लावा. लिंबामुळे त्वचा उजळते आणि मधामुळे त्वचेला ओलावा मिळतो.
बेसन, हळद आणि दही एकत्र करून बनवलेले उटणे हा देखील एक उत्तम नैसर्गिक ब्लीचिंग पर्याय आहे. यामुळे त्वचेला कोणताही धोका न होता नैसर्गिक चमक येते.