Rahul Shelke
महागाईमुळे पैशांची किंमत काळानुसार कमी होत जाते. 2040 मध्ये आजच्या 1 कोटी रुपयांची किंमत किती असेल याबद्दल जाणून घेऊया.
घर, शिक्षण, लग्न या सर्व गोष्टींची किंमत काळानुसार वाढत जाणार आहे. आज आपल्याला 1 कोटी पुरेसे वाटतात, पण भविष्यात त्याची किंमत तितकी राहणार नाही.
दरवर्षी वस्तूंचे दर वाढतात जसे की अन्न, औषधं, घर, गाडी. त्याच पैशात नंतर कमी वस्तू मिळतात. यालाच महागाई म्हणतात.
भारतामध्ये महागाई दर गेल्या अनेक वर्षांत साधारण 5% ते 7% दरम्यान राहिला आहे. याचा परिणाम आपल्या बचतीवरही होत असतो.
महागाई दर 6% गृहीत धरल्यास 2040 मध्ये 1 कोटीची किंमत सुमारे 40–45 लाख रुपये असेल.
आज ज्या गोष्टी तुम्ही 1 कोटीमध्ये खरेदी करू शकता, त्याच गोष्टी 2040 मध्ये खरेदी करायच्या असतील तर 2.39 कोटी रुपये लागतील.
बँकेचे व्याजदर अनेकदा महागाईला हरवू शकत नाहीत. त्याचा परिणाम असा होतो की बचत कमी होत जाते.
योग्य गुंतवणूक आणि दीर्घकालीन प्लॅन केल्यास यावर मात करता येते. म्युच्युअल फंड्स, शेअर्स, डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ महागाईपेक्षा जास्त रिटर्न मिळवून देऊ शकतात.
मार्केटमध्ये रिस्क असतेच, पण दीर्घकाळात इक्विटीमध्ये महागाईवर मात करण्याची क्षमता आहे.
भविष्यासाठी 1 कोटी पुरेसे वाटत असतील, तर आत्ताच विचार बदला. योग्य गुंतवणूक केल्यास तुम्ही महागाईपासून स्वत:चा बचाव करु शकता.