अविनाश सुतार
१ किलो चरबी म्हणजे सुमारे ७, ७०० कॅलरीज असतात. ही शरीरात साठवलेली खरी चरबी असते
खरी चरबी कमी होण्यासाठी वेळ लागतो, चरबी म्हणजे साठवलेली ऊर्जा असते. एकदा ती जाळली की, ती कायमची निघून जाते
१ हजार पावले चालले की, ५० ते ७० कॅलरी खर्च होतात, प्रत्येक पावलासाठी शरीर ऊर्जा वापरते
७,७०० कॅलरी जर सरासरी ६० कॅलरी (प्रति १,००० पावले) यांनी भागले, तर अंदाजे १,२८,००० ते १, ५०,००० पावले चालावे लागतात
केवळ चालण्याच्या माध्यमातून १ किलो चरबी जाळण्यासाठी १, २८,००० ते १, ५०,००० पावले चालणे आवश्यक आहे
तुम्ही रोज १०, ००० ते १५, ००० पावले चाललात, तर १० ते १२ दिवसांत १,००,००० ते १, ५०, ००० पावले पूर्ण होऊ शकतात
आहार, इतर व्यायाम किंवा रोजच्या कॅलरी खर्चाचा विचार न करता, दोन आठवड्यांच्या आत १ किलो चरबी कमी करता येऊ शकते
चालण्याने कॅलरी जळतात, हळूहळू चरबी कमी होते, पण चालण्यामध्ये सातत्य हवे
दीर्घकालीन चरबी कमी करण्यासाठी चालणे उत्तम मार्ग आहे, पण यामध्ये सातत्य हवे, एखाद्या दिवसात चमत्कार होणार नाही