Rahul Shelke
नगरसेवक किंवा नगराध्यक्षांना सरकारी नोकरीसारखा पगार मिळत नाही. त्यांना मासिक मानधन दिलं जातं.
हे मानधन म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्याबद्दल दिली जाणारी रक्कम. ही रक्कम शहराच्या आकारावर आणि वर्गवारीवर ठरते.
महानगरपालिका, नगरपरिषद किंवा नगरपंचायत, संस्थेचा दर्जा जितका मोठा, तितकं मानधन जास्त.
मुंबईसारख्या A+ ग्रेड महानगरपालिकेत नगरसेवकांना दरमहा सुमारे ₹25,000 पर्यंत मानधन मिळतं.
लहान शहरांमध्ये किंवा नगरपरिषदांमध्ये हे मानधन साधारण ₹10,000 ते ₹20,000 दरम्यान असतं.
नगराध्यक्षांचं मानधन नगरसेवकांपेक्षा जास्त असतं. ते साधारण ₹25,000 ते ₹50,000 दरम्यान असू शकतं.
काही ठिकाणी जुन्या नियमांनुसार मानधन कमी होतं, पण वेळोवेळी शासन निर्णयांमुळे रक्कम बदलते.
मानधनाव्यतिरिक्त लोकप्रतिनिधींना बैठक भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर सुविधा मिळतात.
काही नगराध्यक्षांना वाहन, कर्मचारी आणि कार्यालयीन सुविधा देखील दिल्या जातात.
महत्वाचं म्हणजे हे सगळं पगार नाही, तर सेवेसाठी दिलं जाणारं मानधन आहे. राज्यनुसार नियम वेगवेगळे असतात.