पुढारी वृत्तसेवा
बटाटे शिजवण्यापूर्वी त्यांच्या मधोमध सुरीने एक हलका गोल काप द्यावा, यामुळे साले झटकन निघतात.
बटाटे उकडताना पाण्यात थोडे मीठ घातल्यास बटाटे लवकर शिजतात आणि त्यांची चवही वाढते.
बटाटे शिजायला घालताना थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर केल्यास वेळ वाचतो.
शिजलेले बटाटे गरम पाण्यातून काढल्यावर लगेच बर्फाच्या थंड पाण्यात टाकल्यास साल हाताने सहज सोलली जाते.
बटाटे उकडताना नेहमी एकाच आकाराचे निवडावे, जेणेकरून ते सर्व एकाच वेळी व्यवस्थित शिजतील.
वेळेची बचत करण्यासाठी बटाटे नेहमी प्रेशर कुकरमध्ये शिजवावेत, यामुळे ते आतून मऊ होतात.
बटाटे न कापता शिजवायचे असल्यास त्यांना फॉर्कने थोडे टोचून घ्यावे, यामुळे वाफ आतपर्यंत पोहोचते.
बटाटे उकडण्यासाठी शक्यतो स्टील किंवा ॲल्युमिनियमचे भांडे वापरावे जेणेकरून उष्णता समप्रमाणात मिळते.