पुढारी वृत्तसेवा
मटण हा भारतीय आहारातील लोकप्रिय पदार्थ आहे. आठवड्याला किंवा विशेष प्रसंगी अनेकांच्या घरात मटणाच्या जेवणाचा बेत केला जातो
मटणामधील उच्च दर्जाची प्रथिने, लोह, झिंक आणि व्हिटॅमिन बी-१२ यांसारखे पोषक घटक शरीराला मिळण्यास मदत होऊ शकते
२ ते ५ वयोगटातील मुलांना मटण चांगले शिजवून, मऊ करून आणि कमी प्रमाणात द्यावे. एका वेळी साधारण ३० ते ५० ग्रॅम शिजलेले मटण द्यावे
६ ते १२ या वयात मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ वेगाने होते, प्रथिने, लोह आणि झिंक यांची गरज पूर्ण करण्यासाठी आहारात मटणाचा वापर करावा
१३ ते १८ या वाढत्या वयात स्नायूंची निर्मिती आणि हार्मोनल बदल वेगाने होतात. त्यामुळे या वयोगटात ७५ ते १०० ग्रॅम शिजलेले मटण एका वेळी घेता येऊ शकते
१८ ते ४० वर्षे : शारीरिक हालचालींनुसार तरुण वयात शरीराची ऊर्जा आणि प्रथिनांची गरज भागविण्यासाठी ७५ ते १०० ग्रॅम मटण एका जेवणात पुरेसे असू शकते
४० ते ५० या वयात वजन, रक्तदाब किंवा रक्तातील कोलेस्टेरॉलशी संबंधित समस्या दिसू लागतात. त्यामुळे मटण खाताना चरबीचे प्रमाण आणि स्वयंपाकाची पद्धत महत्त्वाची ठरते
पन्नाशीनंतर शरीराची ऊर्जा गरज कमी होते. त्यामुळे जास्त मटण खाणे आवश्यक नसते. साधारण ५० ते ७५ ग्रॅम मटण एका वेळी घेणे पुरेसे ठरू शकते
साधारण ५० ते ७५ ग्रॅम शिजलेले मटण एका वेळी पुरेसे ठरू शकते. किडनी, हृदय किंवा इतर दीर्घकालीन आजार असल्यास वैयक्तिक आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते