Anirudha Sankpal
बीपीचा धोका होतो कमी
'ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशन'नुसार रोज सुका मेवा खाल्ल्याने हाय बीपीचा धोका २० ते ३० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
भारतात गंभीर समस्या
देशात १८ वर्षांवरील तब्बल ३०% लोक हायपरटेंशनने ग्रस्त असून डब्ल्यूएचओनुसार २० कोटी रुग्णांपैकी केवळ १०-१२% लोकांचे बीपी नियंत्रणात असते.
हृदयासाठी फायदेशीर
चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे वाढणाऱ्या बीपीवर नियंत्रण ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास सुका मेवा मदत करतात.
मोठे संशोधन
तब्बल १ लाख ४३ हजार ३८० लोकांवर केलेल्या अभ्यासात दररोज सुका मेवा खाणाऱ्यांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका लक्षणीयरीत्या कमी आढळला.
सुका मेव्याचे योग्य प्रमाण
दररोज २८ ग्रॅम सुका मेवा खाल्ल्याने बीपीचा धोका २०% तर ३०-३५ ग्रॅम नट्स खाल्ल्याने २६% बीपीचा धोका कमी होतो.
संशोधनाची मर्यादा
या अभ्यासात सर्व प्रकारच्या सुक्या मेव्यांचे एकत्र विश्लेषण केल्यामुळे नक्की कोणता एक ड्राय फ्रूट जास्त फायदेशीर आहे, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
सुका मेवा नेमकं काय करतो
सुक्या मेव्यात असणारे पोषक घटक रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
सुका मेवा या लोकांसाठी मात्र वर्ज्य
सुका मेव्याची ॲलर्जी असलेल्यांनी किंवा पोटाच्या गंभीर समस्या असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे.