how mosquitoes find humans: अंधारात डास कसे शोधतात माणसांना, फक्त रात्रीच का चावतात?

Shivani Badadhe

डास एखाद्या व्यक्तीला कसे शोधतात हा प्रश्न अनेकदा मनात येतो, पण नेमक त्यामागील कारण आज आपण समजून घेणार आहोत.

mosquito behavior science | Pudhari

विज्ञानानुसार, कार्बन डायऑक्साइड, शरीरातील उष्णता आणि वास हे घटक यासाठी जबाबदार असतात. ज्यामुळे ते त्या व्यक्तीकडे आकर्षित होतात.

mosquito attraction factors | Pudhari

जेव्हा एखादी व्यक्ती श्वास घेते, तेव्हा ऑक्सिजन शरीरात प्रवेश करतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो. डास कार्बन डायऑक्साइडकडे इतके आकर्षित होतात की ते त्याचा मागोवा घेत माणसापर्यंत पोहोचतात.

body heat mosquito attraction | Pudhari

आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे उष्णता. डासांमध्ये माणसांच्या शरीरातील उष्णतेवरून त्यांना ओळखण्याची क्षमता असते.

dengue mosquito day biting | Pudhari

शरीराचा वास डासांसाठी जीपीएसप्रमाणे काम करतो, ज्यामुळे त्यांना चावण्यासाठी त्या व्यक्तीचा माग काढण्यास मदत होते.

malaria mosquito night biting | Pudhari

मानवी त्वचेतून लॅक्टिक ॲसिड आणि अमोनियासारखे विविध रासायनिक गंध बाहेर पडतात, जे डासांना खूप आवडतात. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा वास वेगळा असतो.

mosquito prevention tips | Pudhari

जेव्हा एखादा व्यक्ती झोपलेला असतो, तेव्हा त्यांना चावणे अधिक सोयीचे वाटते, कारण कमी झालेल्या हालचालींमुळे त्यांना चावणे सोपे जाते. फक्त मादी डासच चावतात.

insect behavior facts | Pudhari

मादी डासला अंडी घालण्यासाठी प्रथिनांची गरज असते आणि ही प्रथिने त्यांना मानवी रक्तातून मिळतात.

dengue mosquito | Pudhari
येथे क्लिक करा