Anirudha Sankpal
उन्हाळ्यात दूध खराब होऊ नये म्हणून अनेक जण ते वारंवार उकळतात, पण यामुळे दुधातील पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात.
कच्चे दूध सुरुवातीला एकदा व्यवस्थित उकळणे गरजेचे आहे, कारण त्यामुळे दुधातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात.
दुधाचे पोषण टिकवून ठेवण्यासाठी दिवसभरात ते जास्तीत जास्त फक्त २ ते ३ वेळाच उकळावे.
पैकेटचे दूध आधीच पाश्चराइज्ड (Pasteurized) केलेले असल्याने ते एकदाही न उकळता थेट पिण्यायोग्य असते.
दूध जास्त वेळ उकळत न ठेवता, उकळी आल्यानंतर फक्त २ ते ३ मिनिटांत गॅस बंद करावा.
दूध उकळल्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्यावे आणि नंतर दीर्घकाळ ताजे राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे.
घरात फ्रिज नसेल, तर दूध उकळताना त्यात चिमूटभर खाण्याचा सोडा (Baking Soda) टाकल्यास दूध फाटत नाही.
तसेच, दुधाचे भांडे एका थंड पाण्याच्या मोठ्या भांड्यात ठेवूनही उन्हाळ्यात दूध बराच वेळ खराब होण्यापासून वाचवता येते.