पुढारी वृत्तसेवा
हिंदू धर्मात पूजेदरम्यान घंटी वाजवण्याची परंपरा खूप जुनी आहे.
पूजा करताना, आरती दरम्यान किंवा देवाला नैवेद्य दाखवताना घंटी वाजवली जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, घंटीच्या आवाजामुळे घरात सकारात्मक ऊर्जा (पॉझिटिव्ह एनर्जी) येते, अशीही श्रद्धा आहे.
अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की, घराच्या मंदिरात घंटी नेमकी किती वेळ वाजवावी? ती जास्त वेळ वाजवावी की केवळ काही सेकंदांसाठीच वाजवावी?
धार्मिक मान्यतेनुसार, घंटीच्या आवाजामुळे मन एकाग्र होते. घंटीच्या आवाजामुळे लक्ष देवाकडे केंद्रित होते.
देवाला पूजेसाठी जागृत करण्याचे प्रतीक म्हणूनही याकडे पाहिले जाते.
घंटीच्या ध्वनीमुळे घरातील वाईटात वाईट ऊर्जा बाहेर पडते, अशीही श्रद्धा आहे.
धार्मिक नियमांनुसार, घंटी खूप वेळ सतत वाजवण्याची गरज नसते. पूजेदरम्यान काही क्षणांसाठी घंटी वाजवणे शुभ मानले जाते.
विशेषतः देवाला नैवेद्य दाखवता, तेव्हा घंटी नक्की वाजवावी.
धार्मिक परंपरेनुसार, नैवेद्य दाखवताना १, ३ किंवा ५ वेळा घंटी वाजवावी. सामान्यतः ५ वेळा घंटी वाजवणे सर्वात शुभ मानले जाते.
घंटी नेहमी भक्तीभावानेच वाजवावी.घंटी खूप मोठ्या आवाजात किंवा वारंवार वाजवणे टाळावे.
टीप: ही माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.