Daily Water Requirement : एका व्यक्तीला दररोज किती लिटर पाणी लागते? जाणून घ्या सरकारी निकष

पुढारी वृत्तसेवा

यंदा पावसाने ओढ दिल्‍याने राज्‍यातील विविध शहरांमध्‍ये पाणी टंचाईच्‍या झळा बसण्‍यास सुरुवात झाली आहे.

CPHEEO ही संस्था देशातील शहरी पाणीपुरवठ्याचे मानक निकष ठरवते.

शहरी भागांसाठी CPHEEO ने १३५ लिटर प्रति व्यक्ती प्रतिदिन (LPCD) हा पाणीपुरवठ्याचा मानक निकष ठरवला आहे.

सर्वाधिक म्हणजे सुमारे ५५ लिटर पाणी आंघोळीसाठी वापरले जाते.

घरात टॉयलेटसाठी दररोज प्रतिव्यक्ती ३० लीटर पाण्याचा वापर गृहीत धरला जातो.

रोजचे कपडे धुण्यासाठी व्यक्तीमागे २० लीटर पाण्याचे प्रमाण मानले जाते.

पिण्‍यास आणि स्वयंपाकासाठी मिळून दररोज सुमारे १० लिटर पाणी प्रमाण मानले जाते.

भांडी धुण्‍यासाठी १० लीटर आणि घर स्वच्छ ठेवण्यासाठी १० लीटर पाणी आवश्यक मानले जाते.

शहरी भागांमध्ये प्रति व्यक्ती १३५ लिटर प्रतिदिन हा सर्वाधिक वापरला जाणारा पाणीपुरवठा निकष आहे.

मोठ्या महानगरांमध्ये सांडपाण्यासाठी भूमिगत मलनिस्सारण व्यवस्था उपलब्ध असते, तिथे प्रतिव्यक्ती १५० ते २०० लीटर पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते.

शहराचा आकार, लोकसंख्या आणि सुविधा यानुसार पाणीपुरवठ्याचे निकष बदलू शकतात.

येथे क्‍लिक करा.