Rahul Shelke
६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक राज्याभिषेक झाला.
हा भव्य सोहळा रायगड किल्यावर झाला. रायगड अक्षरशः गजबजून गेला होता.
डच ऐतिहासिक नोंदी सांगतात की, रायगडावर त्या दिवशी सुमारे ११,००० लोक उपस्थित होते
या सोहळ्यासाठी राजे-रजवाडे, ब्राह्मण, सरदार, व्यापारी आणि सामान्य जनता रायगडावर दाखल झाली होती.
स्वराज्यातील मावळे, अष्टप्रधान मंडळाचे सदस्य, परदेशी प्रतिनिधी आणि विविध संस्थानांचे दूतही उपस्थित होते.
पाहुण्यांसाठी स्वतंत्र निवासव्यवस्था, राजेशाही भोजन आणि स्वागताची भव्य तयारी करण्यात आली होती.
हा केवळ राजाभिषेक नव्हता तो मराठी स्वराज्याच्या अधिकृत स्थापनेचा ऐतिहासिक क्षण होता.
शिवाजी महाराजांनी “छत्रपती” ही उपाधी स्वीकारत जनतेसमोर स्वराज्याचा कारभार औपचारिकपणे हाती घेतला.
रायगडावरचा तो दिवस आजही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे.
प्र.न. देशपांडे लिखित 'छत्रपती शिवाजी महाराज' हे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.