पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र ६० ते ७० पेक्षा जास्त बोलीभाषा आणि अनेक मातृभाषा बोलल्या जातात. महाराष्ट्राची खरी ताकद त्याच्या भाषिक वैविध्यात आहे
महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा म्हणजे मराठी. प्रशासन, शिक्षण, साहित्य आणि सांस्कृतिक परंपरेत मराठीचा मोठा प्रभाव आहे
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषाही बोलल्या जातात. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमध्ये भाषांचं मिश्र संस्कृतीचं चित्र दिसतं
मराठीच्याच १५ ते २० पेक्षा अधिक पोटभाषा महाराष्ट्रात प्रचलित आहेत. प्रत्येक भागानुसार बोलण्याची ढब, शब्द आणि उच्चार बदलतात
अहिराणी, मालवणी, वऱ्हाडी, कोल्हापुरी, झाडीबोली अशा अनेक बोलीभाषा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहेत
महाराष्ट्रातील आदिवासी समाजात १७ पेक्षा जास्त स्वतंत्र भाषा बोलल्या जातात. या भाषा अनेक पिढ्यांपासून जपल्या गेल्या आहेत
भटके आणि विमुक्त जमातींमध्येही १७ ते १९ वेगळ्या भाषा आणि बोली आजही वापरात आहेत. या भाषा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहेत
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात तब्बल २३१ मातृभाषांची नोंद झाली होती. यावरून राज्यातील भाषिक विविधतेची कल्पना येते
महाराष्ट्रात प्रत्येक भागाची भाषा वेगळी आणि त्यासोबत तिथली संस्कृती, लोककला, म्हणी आणि परंपराही बदलतात. भाषा म्हणजे त्या भागाची ओळख असते
महाराष्ट्र फक्त मराठी भाषेपुरता मर्यादित नाही, तर विविध भाषा आणि बोलीभाषांचा संगम आहे. हीच विविधता महाराष्ट्राला अधिक समृद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत बनवते