पुढारी वृत्तसेवा
विराट कोहलीचा सोशल मीडिया जलवा!
RCB ने IPL जिंकताच Instagram वर विराटच्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली.
RCB पुन्हा IPL चॅम्पियन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करून सलग दुसरे IPL विजेतेपद पटकावले.
विजयाचा नायक ठरला विराट
विराट कोहलीने 75 धावांची नाबाद खेळी केली आणि विजयी षटकार ठोकत RCB ला ट्रॉफी जिंकून दिली.
प्लेअर ऑफ द मॅच विराट
अंतिम सामन्यातील शानदार कामगिरीसाठी विराट कोहलीला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला.
मैदानात जलवा, सोशल मीडियावरही धुमाकूळ!
ट्रॉफी जिंकल्यानंतर विराटच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. चाहत्यांनी Instagram वर अक्षरशः फॉलोअर्सचा पाऊस पाडला.
31 मे रोजी किती वाढले फॉलोअर्स?
RCB च्या विजयानंतर 31 मे 2026 रोजी विराटच्या Instagram खात्यावर 75,399 नवीन फॉलोअर्स वाढले.
1 जूनलाही वेग कायम
विजयानंतरचा उत्साह दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. 1 जून 2026 रोजी तब्बल 79,861 नवीन फॉलोअर्स विराटला मिळाले.
2 दिवसांत एकूण किती वाढ?
31 मे आणि 1 जून मिळून विराटच्या खात्यावर 1,55,260 नवीन फॉलोअर्सची भर पडली!
फक्त क्रिकेटर नाही, ग्लोबल आयकॉन
विराट कोहली हा जगातील सर्वाधिक फॉलो केलेल्या खेळाडूंमध्ये गणला जातो. त्याच्या प्रत्येक यशाचा प्रभाव सोशल मीडियावर दिसून येतो.
विराटची लोकप्रियता
RCB च्या विजयासोबत विराट कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, "किंग कोहली" फक्त मैदानाचाच नाही, तर सोशल मीडियाचाही बादशाह आहे!